खरं तर आज wild life पेक्षा जरा वेगळ लिहितोय .............
आज सकाळी क्लास जाला अणि घरी यायला निघालो . जरा change म्हणून मारुती रोड वर गाड़ी घातली . अणि तेवढ्यात पावसाला सुरवात झाली . गाड़ी पावसात तशीच सोडून आडोशाला उभा राहिलो . सकाळचे ७ वाजले होते . चहाची वेळ . समोर मस्त एका टपरीवर रेडिओ लावला होता . pahilyach सरीचा ओला सुवास आला... मस्त गाण लागलं होतं ...
म्हंटल चला एक कटिंग मारू . टपरीच्या पत्र्यावारून पडणारी पावसाची धार नकळत चाहत पडत होती. पण तिकडे लक्ष देण्यापेक्षा त्या पलीकडचा पाउस लई भारी होता ... चाह संपला ...गाण पण संपलं होतं ...गाड़ीला किक मारली अणि घरी गेलो . घरी गेल्यावर कल्ला की हरिपुर मधे एक काम करुन यायचं आहे . मला काय ... मला हवच होतं . पुन्हा गाड़ी काढली ..सरळ हरिपुरचा रस्ता धरला . रस्त्यावर कोणीही नव्हतं . पाउस जोरात चालू ..डोक्यावर टोपी नाही ...चाश्म्यावर सगले थेम्ब...अणि गाड़ी ४ थ्या गिअर वर ... काम लगेच उरकल..थांबून उपयोग नव्हता ..पाउस थांबला असता..तसाच घरी आलो . परत एकदा चाहा झाला..पण या वेळी सोबतीला parle - G होतं .
संध्याकाळी ७ ला क्लास सुटल्यावर मारुती रोड वरून मित्राबरोबर घरी येत होतो . च्या मारी तेवढ्यात पुन्हा पाउस . इतका जोरात आला की रस्त्यावरच्या लोकांची धावपळ झाली . पुन्हा नेहमीचं चित्र ...दुकानाचे कट्टे पटापट लोकांनी भरून गेले . त्यात आम्हीपण होतो ..दुकानाच्या आडोशाला थांबलो........ . lights off..मस्त खमंग वास सुटला होता ...अणि गरम तेलात काहीतरी टाकल्याचा आवाज आला ..समोर वाडेवाला होता . मस्त गरम ..समोर वडे .. त्यात पाउस ...अणि आम्ही काय ही संधी सोडणार होतो ?.. दोन वडे हाणले...मित्राने {धनंजय}अणि २ वाड्याची order दिली . माझ्या डोक्यात एक भारी idea आली . bag मधे dominos च flecs होत . फोडला अणि वाड्यावर घातला . Dominos VADA . wow ! आता मात्र पाउस फार वाढला होता पाणी घोट्यापर्यंत आलं होतं .
...... मजा आली आज ...खूप भारी वाटलं ...तुमचाही पाउस असाच झाला असेल न ? मला सांगायला विसरु नका . just add your comment here and share ur पाउस .....
असा पाउस मनमानी ...असा पाउस मनमानी ....
त्याची बेफिकिरी करते सरिसरी ना तूफानी