रविवार, १६ मे, २०१०

Yana

                        याना ......... लक्षात राहण्यासारखे ठिकाण . या वर्षी आमचा कैंप याना ला होता . ( याना - tq.- कुमठा , dist.- उ. कन्नडा, कर्नाटक )  yana rocks हे तिथल आकर्षण . ज्वलामुखिपसून बनलेले अणि पाउस, वारा,ऊन यांच्या आघाताने झिजलेले मोठे पाषाण . इतके मोठे की पूर्ण पाषाण बघायला मान पूर्ण वाकडी करावी लगते .तर या आशा मस्त ठिकाणी आमचा कैंप पार पडला .

                        हे गाव ( गाव नाहीच वस्ति आहे ३१ घरांची ) तसा जंगलात वसलेल. So, nature camp घ्यायला अगदी योग्य . प्राणी तसे फरसे नाहीत पण पक्षी मात्र भरपूर , वनस्पति शास्त्रालाही खाद्य पुरेपुर . So,कैंप मस्त झाला असणार यात शंकाच  नाही.    
                       आम्ही ६१ जण होतो .म्हणजे त्यात आमचं volenteer च टोळक होतच. मस्त दंगा करणारं . 1 मे- ६ मे या कालावधीत कैंप होता . पाहिले २ दिवस जंगलात ट्रेक होते. ४ तारखेला long treak , विभूति फ़ॉल्स ला . विभूति फ़ॉल्स याना पासून ८ km. लांब . चालत गेलो सगळे . तिथे पुन्हा खडी उतरण . अणि शेवटी मस्त उंच धबधबा. गार पाण्यात मनसोक्त हत्ती सारखं डूंबलो.  
                         कतगल च्या अलीकडे १ km.  वर यानाचा फाटा आहे . त्या फट्याने सरळ गेलात तर १५ मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला एक टेलीफ़ोन exchenger ऑफिस दिसेल . त्या ऑफिस च्या समोर विनायक हेडगेच घर आहे . तो त्या ऑफिस मधे काम करतो . विनायक हा यानाचा पर्यटक अधिकारी म्हंटल तरी चालेल . कारण या वस्तीत त्याचं एकट्याचंच रेसॉर्ट आहे . रहायची सोय पण मस्त . एक झोपड़ी आहे रहायला . तशी मोठी आहे . पण खरच जंगलात रहायला गेल्याचा खरा feel इथे येतो . विनायकंच तुमचे treak ठरवेल. त्याला पूर्ण जंगल पाठ आहे . विनायकचे मित्र अप्पू ( पुरुषोत्तम) अणि संतोष पण तुम्हाला भेटतील . एवढच नाही विनायक तुम्हाला orkut वर पण भेटेल . माझ्या friend list माहे आहे तो . बाकी सारी व्यवस्था तो करेलच .
                          याना च आणखी एक वैशिष्ठ म्हणजे तिथे सेंचुरी पाम आहेत . हे एक प्रकारचे पाम आहेत ज्यांना ८० ते ९० वर्षांनी फुलोरा येतो अणि एकदा फुलोरा येउन गेला की ते मरून जातात  . त्यांची ऊँची सुद्धा फार . एकंदर काय तर यानात सारं काही अवाढव्य आहे .

          मग दिवाळीची  सुट्टी यानात घालवायचा विचार आहे की नाही ? जाताना मला जरुर सांगा . मी पण यायला तयार आहे .
          Vinu Hedge -9448022782